Skip to main content

Posts

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

Aryan Khan Release : आर्यनची सुटका, पण मुनमुन धामेचा नियमांमध्ये अडकली; वकिलांची धावाधाव सुरू!

बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला २५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. त्याच्यासोबतच अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांना देखील जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या तिघांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. पण एकीकडे आर्यन खानची सुटका होत असताना दुसरीकडे मुनमुन धामेचाचे वकील मात्र मुंबई उच्च न्यायालयात धावाधाव करताना दिसून आले. कारण जामीन मंजूर होऊन देखील मुनमुन धामेचाची सुटका नियमांच्या कचाट्यात अडकली आहे. नेमकं झालं काय? आर्यन खानसोबतच मुंबई उच्च न्यायालयाने मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट या दोघांना देखील जामीन मंजूर केला. आर्यन खानसाठीची कोर्ट ऑर्डर आणि ऑपरेटिव्ह पार्ट सुटकेसाठी तुरुंगात पोहोचला. मात्र, मुनमुन धामेचाला यासाठी चांगलीच धावपळ करावी लागत आहे. आर्यन खानच्या जामिनासाठी शाहरुख खानची मैत्रीण जुही चावला ही जामीनदार म्हणून राहिली आहे. १ लाखांच्या जातमुचलक्यावर आर्यन खानची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र, असा जामीन शोधण्यात मुनमुन धामेचाला अडचण येत असल्याचं सांगितलं जात आहे. #MunmunDhamecha 's counsel has moved an u...

यूपीएससी वन सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

Prelims : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२१ आणि भारतीय वनसेवा पूर्व परीक्षा २०२१ चे निकाल जाहीर केले आहेत. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी निकाल जाहीर करण्यात आले. आयोगाने पुढील टप्प्यात म्हणजेच सिव्हिल सर्व्हिसेस (पूर्व) आणि IFS (पूर्व) च्या आधारे मुख्य परीक्षेत बसण्यास पात्र ठरलेल्या उमेदवारांचे रोल नंबर जाहीर केले. यूपीएससी आयएएस पूर्व २०२१ परीक्षेला बसलेले उमेदवार आयोगाने जाहीर केलेल्या पात्र उमेदवारांच्या यादीमध्ये त्यांचा रोल नंबर तपासू शकतात. यूपीएससीने १० ऑक्टोबर २०२१ रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर प्रत्येकी २ तासांच्या दोन शिफ्टमध्ये प्राथमिक परीक्षेचे आयोजन केले होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा आणि आयएफएस प्राथमिक परीक्षांमधील कामगिरीच्या आधारे पुढील टप्प्यासाठी यशस्वी उमेदवारांना मुख्य परीक्षेत बसण्यासाठी अर्ज (DAF) भरावा लागेल. आयोगाने DAF भरण्याच्या तारखा जाहीर केल्या नसल्या तरी यूपीएससीने उमेदवारांना डिएएफसाठी अधिकृत वेबसाइटला वेळोवेळी भेट देण्याचे आवाहन केले आहे. अंतिम निकालानंतर पूर्व परीक्षेचे गुण आणि कट ऑफ जाहीर यूपीएससीने जाहीर केले...

MAH MBA CET 2021: एमबीए सीईटीचा निकाल जाहीर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई एमबीए-एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेचा निकाल प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केला आहे. या निकालामुळे रखडलेल्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. एमबीए-एमएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा कक्षातर्फे प्रवेश प्रक्रिया घेतली जाते. या परीक्षेला राज्यभरातून एक लाख ३२ हजार १९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांची सीईटी १६ ते १८ सप्टेंबर काळात घेण्यात आली होती. सुमारे २०० केंद्रावर दरारोज दोन सत्रात परीक्षा ऑनलाइन घेण्यात आली. एक लाख १० हजार १९० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षा दिल्यानंतर ३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेतील त्रुटी समोर आणत ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आणि हे विद्यार्थी न्यायालयात गेल्यामुळे निकाल जाहीर करता आला नाही. मात्र, प्रवेश प्रक्रियेवर होणारा उशीर लक्षात घेऊन यापूर्वीच न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणेच त्या विद्यार्थ्याचा निकाल राखून ठेवत सीईटी सेलने शुक्रवारी निकाल जाहीर केला आहे. अंतिम सुनावणीनंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. मुंबईस...

आर्यन खानची सुटका कधी होणार? ऑर्थर रोड जेलचे पोलीस अधीक्षक म्हणाले…

प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने क्रुझ शिप ड्रग्ज प्रकरणी गुरुवारी (२८ ऑक्टोबर) जामीन मंजूर केला. मात्र, अद्यापही तो तुरुंगाबाहेर निघाला नाहीये. शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) न्यायालयाचा आदेश निघाला त्यानंतर आर्यनची सुटका होईल असं वाटलं मात्र तेव्हाही सुटका झाली नाही. अखेर आज (३० ऑक्टोबर) सकाळपासून आर्यनच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू झालेत. आता आर्यनची सुटका कधी होणार याबाबत मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगाचे पोलीस अधीक्षक निती वायचाळ यांना विचारले असता त्यांनी याचं उत्तर दिलंय. ते माध्यमांशी बोलत होते. Mumbai | We have received Aryan Khan's release order. The process of his release should be completed in 1-2 hours: Nitin Waychal, Superintendent, Arthur Road Jail pic.twitter.com/rAyriIfEyX — ANI (@ANI) October 30, 2021 ऑर्थर रोड जेलचे पोलीस अधीक्षक नितीन वायचाळ म्हणाले, “आम्हाला आर्यन खानला सोडण्याचे आदेश मिळाले आहेत. त्याला सोडण्याची सर्व प्रक्रिया १ ते २ तासात पूर्ण केली जाईल.” हेही वाचा : आर्यन खानला १ लाख रुपयांच्या बाँडसह ‘या’ १४ अटींवर जामीन, उ...

आधी कोऱ्या कागदावर सह्यांचा आरोप, आता मागील वर्षापासून ५ प्रकरणांमध्ये एनसीबीकडून एकच पंच, काय आहे प्रकरण?

एनसीबीने (NCB) मुंबई क्रुझ शिप ड्रग्ज प्रकरणात दाखवलेल्या १० पंचांपैकी आदिल फजल उस्मानी हा पंच २०२० पासून ५ प्रकरणांमधील पंच आहे. याशिवाय पंच के. पी. गोसावी आणि मनिष भानूशाली या २ पंचांवरही गंभीर आक्षेप घेण्यात आलेत. यापैकी गोसावी फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत आहे, तर भानूशालीचे भाजपशी संबंध आहेत. याशिवाय प्रभाकर साईल या पंचाने एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर पंचनाम्यासाठी कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्याचा गंभीर आरोप केलाय. यामुळे एनसीबीच्या पंच आणि पंचनाम्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पंचांवरील आरोपांवर एनसीबीनं म्हटलं आहे, “अनेकदा कायदेशीर प्रक्रियेत अडकायला नको म्हणून किंवा ड्रग्ज माफियांच्या भितीने पंच छापेमारीच्या ठिकाणी लोक पंच व्हायला तयार नसतात. त्यामुळेच ओळखीच्या पंचांवर अवलंबून राहावं लागतं.” असं असलं तरी कायम प्रत्येक प्रकरणात पंच होणारे व्यक्ती पोलिसांच्या मर्जीतील असतात. त्यामुळे त्यांना स्वतंत्र पंच मानता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका न्यायालय घेतं. “५ प्रकरणांमध्ये एनसीबीचा पंच पत्त्यावर सापडला नाही” आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात उस्मा...

आर्यन खानची थोड्याच वेळात सुटका; मुलाच्या स्वागतासाठी शाहरुखची मन्नतवर रोषणाई

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यनची ३० ऑक्टोबरला सुटका होणार आहे. आर्यन खानसह अन्य दोन आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांची आज काही तासांनंतर तुरुंगातून सुटका होणार आहे. जामीन आदेशाची प्रत एनडीपीएस न्यायालयातून आर्थर रोड कारागृहात पोहोचली आहे. शनिवारी सकाळी त्याच्या सुटकेची कागदपत्रे जामीन पत्राच्या पेटीत टाकण्यात आली. आर्यन खानला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. यानंतर शुक्रवारी सत्र न्यायालयात जामीनपत्र भरण्याची कार्यवाही पूर्ण झाली. मात्र, जामिनाची कागदपत्रे मुंबई आर्थर रोड कारागृहातील जामीन पेटीत वेळेवर जमा होऊ शकली नाहीत.त्यामुळे आर्यनची सुटका शनिवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. सुटकेसाठी सुटकेच्या आदेशाची हार्ड कॉपी जेलच्या जामीन पेटीत जमा करावी लागेल. आर्यन खानच्या रिलीझ ऑर्डरची शुक्रवारी संध्याकाळी ५:३५ पर्यंत वाट पाहण्यात आली, पण तो येऊ शकला नाही. त्यामुळे त्याला शनिवारी सोडण्यात येणार आहे. आर्थर रोड जेलचे अधीक्षक नितीन वायचल यांनी सांगितले. त्यानंतर शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास तुरुंग अधिकाऱ्यांनी आर्थर रोड कारागृहाबाहेर ज...

सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील सेवेतून निलंबित; लाचखोरी प्रकरणात अटक झाल्यानंतर कारवाई

मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना लाचखोरी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना अटक केल्यानंतर आता पोलीस विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ४०,००० रुपयांची लाच घेताना सुजाता पाटील यांना रंगेहाथ पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुजाता पाटील यांना एसीबीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची विशेष न्यायालयाने जामीनावर सुटका केली होती. मात्र या प्रकाराची गंभीर दखल घेत, शासनाने सुजाता पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तक्रारदाराकडून ४०,००० रुपयांची लाच आणि एक लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यानंतर आता पोलीस विभागाने त्यांच्यावर कारवाई करत सुजाता पाटील यांना सेवेतून निलंबित केले आहे. Mumbai Police: Assistant Commissioner of Police Sujata Patil suspended from service. She was arrested by Anti-Corruption Bureau for allegedly accepting a bribe of Rs 40,000 and demanding Rs 1 lakh from a complainant. — ANI (@ANI) October 30, 2021 सुजाता पाटील य...

पालघरजवळ लवकरच विमानतळ ; आदित्य ठाकरे यांची ‘लोकसत्ता’ पर्यटन परिषदेत घोषणा

मुंबई : मुंबई विमानतळाचा पूर्ण क्षमतेने वापर होत असून, भविष्यात नव्याने सुरू होणारा नवी मुंबईचा विमानतळही अपुरा पडू शकतो. ही गरज लक्षात घेता मुंबईजवळ पालघरमध्ये तिसरा विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव असल्याची घोषणा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या पर्यटन परिषदेत केली. कोकणातील सागरी किनारा नियमन क्षेत्राबाबत (सीआरझेड) जानेवारीपर्यंत निर्णय अपेक्षित असून, मुंबईत बॉलिवूड आणि क्रिकेट संग्रहालय उभारण्यासाठी पावले टाकण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.  राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासाच्या संधीबाबत विचारमंथन करण्याच्या उद्देशाने ‘लोकसत्ता’ने आयोजित के लेल्या पर्यटन परिषदेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी राज्याच्या पर्यटन वाढीसाठी सरकार करीत असलेल्या विविध योजनांचा उहापोह ठाकरे यांनी के ला. या वेळी ‘इंडियन हॉटेल्स कं पनी लि.’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत चटवाल हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. करोना काळात निर्बंधांमुळे जनजीवन ठप्प असतानाही या कालावधीत पुढील काही वर्षांमध्ये पर्यटन उद्योगाचा कसा विकास करता येईल...

‘कोव्हिशिल्ड’ची दुसरी मात्रा आता २८ दिवसांनंतरही ; परदेशात जाणारे नागरिक, शासकीय-खासगी कर्मचाऱ्यांना मुभा

मुंबई : पर्यटनासह अन्य कारणांसाठी परदेशात जाणारे नागरिक आणि शासकीय, खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना आता कोव्हिशिल्ड या करोना लशीची दुसरी मात्रा ८४ दिवसांऐवजी २८ दिवसांनंतर घेता येणार आहे. या अनुषंगाने मुंबई महापालिकेने सूचना जारी केल्या आहेत.‘कोव्हिशिल्ड’ची दुसरी मात्रा ८४ दिवसांनी घेता येते. परदेशात शिक्षण किंवा नोकरीसाठी जाणाऱ्या, ऑलिम्पिक खेळाडूंसाठी कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या मात्रेची मर्यादा ८४ दिवसांऐवजी २८ दिवसांनी घेण्याची मुभा देण्यात आली होती.पर्यटनासह अन्य कामांनिमित्त परदेशात जाणाऱ्या नागरिकांची विशिष्ट दिवसांच्या मुदतीच्या अटीमुळे अडचण होत होती. तसेच आता र्निबध शिथिल केल्यानंतर शासकीय आणि खासगी आस्थापना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. तेथील कर्मचारी कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा २८ दिवसांनंतर घेण्यास मुभा देण्याची मागणी सातत्याने करीत होते. या मागणीची दखल घेत पालिकेने लसीकरणाबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार पर्यटनासह अन्य काही कारणांसाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या आणि खासगी, शासकीय आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा २८ दिवसांनंतर घेण्य...

प्रक्रिया पूर्ण न झाल्याने सुटकेला विलंब ; आर्यनला १४ अटींवर जामीन

मुंबई : आर्यन खानला जामीन मंजूर केल्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत उपलब्ध झाल्यानंतरही जामिनाची पुढील प्रक्रिया शुक्रवारी वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे त्याची आज, शनिवारी सुटका होणार आहे. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना १४ अटी घातल्या आहेत. त्यात विशेष न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून न जाण्याचा, भविष्यात असाच गुन्हा केल्यास तात्काळ जामीन रद्द करण्याचा तसेच अपरिहार्य कारण असल्याचा प्रसंग वगळता खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला न्यायालयात हजर राहण्याच्या अटींचा प्रामुख्याने समावेश आहे. दरम्यान, प्रत्येकी एक लाख रुपयांचे वैयक्तिक बंधपत्र आणि तेवढय़ाच रकमेचे एक किंवा अधिक हमीदार देण्याच्या अटीवर त्याची सुटका करण्यात येणार आहे. याशिवाय जामिनावर सुटका झाल्यानंतर आर्यन आणि अन्य दोन आरोपींना विशेष न्यायालयात पारपत्र जमा करण्यासह प्रत्येक शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सुटका का लांबली?  सायंकाळी साडेपाचपर्यंत आर्थर रोड कारागृहाची शेवटची जामिनाची पेटी उघडत...

मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीत ; ओबीसी आरक्षण, सदस्य संख्या बदलाचा परिणाम नाही

मधु कांबळे, लोकसत्ता मुंबई : राज्य सरकारने इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी ) राजकीय आरक्षण, तसेच सदस्य संख्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असला तरी, मुंबई महानगरपालिके ची सार्वत्रिक निवडणूक फे ब्रुवारी २०२२ मध्ये घेण्याचे निश्चित आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. मुंबईसह मुदत संपणाऱ्या इतर महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकाही वेळापत्रकानुसार घेण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना, राज्य सरकारने प्रभाग पद्धती, सदस्य संख्या व ओबीसींच्या आरक्षणाबाबत काही धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे या निवडणुका मुदतीत होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द के ल्याने, त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटले. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी सर्व पक्षांची एकमुखी मागणी होती. परंतु या मुद्दय़ावर निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत, याची जाण...

बुलेट ट्रेन मार्गासाठी निविदा प्रक्रिया सुरू

मुंबई: बहुचर्चित अशा मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील राज्यातील अडथळे दूर होण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाच्या अशा वांद्रे कुर्ला संकुल ते कल्याण शिळफाटा या २०.३७ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गासाठी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉपरेरेशने निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. निविदा भरण्याची अंतिम मुदत मार्च २०२२ आहे. या बोगद्याची खोली २५ ते ४० मीटर एवढी असेल. हा भुयारी मार्ग ठाणे खाडीमार्गे जाईल. यासाठी एक सर्वेक्षणही हाती घेण्यात आले होते. तेदेखील पूर्ण झाल्याचे कॉपरेरेशनकडून सांगण्यात आले. २०.३७ किलोमीटरपैकी सात किलोमीटरचा भुयारी मार्ग हा समुद्राखालून असून हे काम करण्यासाठी नवीन ऑस्ट्रिॅयन पद्धत अवलंबली जाणार आहे. हे काम तीन टप्प्यांत केले जाईल. निविदा प्रक्रिया सुरु केल्याने राज्यातील बुलेट ट्रेनच्या कामाला गतीच दिली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग हा ५०८ किलोमीटर लांबीचा असून वांद्रे कुर्ला संकुल येथून सुरुवात होईल. या स्थानकासाठीही लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. भूसंपादनाची गती मंदावलेलीच बुलेट ट्रेन प्रकल्पात...

मुंबईत पदपथांवरील दोन हत्यांप्रकरणी आरोपी अटकेत

मुंबई : पदपथावर झोपलेल्या दोघांच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून त्यांची निर्घृण हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी सुरेश शंकर गौडा (४०) याला अटक केली आहे. या हत्या १५ मिनिटांच्या कालावधीत आणि दीड किलोमिटरच्या परिसरात झाल्या होत्या.  भायखळा पूर्वेकडील फ्रुट मार्केटच्या पदपथावर झोपलेल्या एका व्यक्तीची शनिवारी सायंकाळी हत्या करण्यात आली होती. पुढे सर जे. जे. मार्ग परिसरात अशाच प्रकारे पदपथावर झोपलेल्या आणखी एकाची पेव्हर ब्लॉकने हत्या करण्यात आली होती. भायखळा आणि सर जे. जे. मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून  तपास सुरू  केला होता. याच दरम्यान, भायखळा येथे लोकलने उतरलेली व्यक्ती या मार्गाने चालत येताना हत्या करत असल्याचे चित्रीकरण सर जे. जे. मार्ग पोलिसांच्या हाती लागले होते. पोलिसांनी पायधुनी, मोहम्मद अली रोड परिसर पिंजून काढत येथील पदपथावर वास्तव्य करत असलेल्या गौडा याला ताब्यात घेतले. हत्या केलेल्या दोघांनाही ओळखत नसून त्यांना विनाकारण मारले असल्याचे त्याने पोलीस चौकशीत सांगितले. गौडाने २०१५ मध्ये कुर्ला येथे पदपथावर झोपलेल्या व्यक्तीची अशाच प्रकारेच दगडाने ठे...

नव्या धोरणांमुळे पर्यटन क्षेत्राला बळ ; राज्याच्या पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग यांचे प्रतिपादन

मुंबई : टाळेबंदीच्या काळात पर्यटन क्षेत्रात शिथिलता आली असली तरी पर्यटन विभागाने कोकणापासून विदर्भातील पर्यटनाचा स्थानिक गरजांनुसार कसा विकास करता येईल याचा अभ्यास करून विविध पर्यटन धोरणे तयार केली. या धोरणांच्या माध्यमातून पर्यटकांच्या सोयीसुविधा, सुरक्षा या दृष्टीने नियमन करण्याबरोबरच राज्यातील पर्यटन व्यवसायालाही मूलभूत स्वरूपाचे पाठबळ मिळेल, अशी अपेक्षा राज्याच्या पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग यांनी व्यक्त केली. ‘लोकसत्ता पर्यटन परिषदे’त राज्यातील पर्यटन वृद्धीच्या नव्या संधींवर आयोजिण्यात आलेल्या चर्चासत्रात सहभागी होताना त्या बोलत होत्या. गेल्या दीड वर्षांत महाराष्ट्र सरकारने बीच श्ॉक, कृषी, साहसी अशी काही पर्यटन धोरणे आणत त्या त्या क्षेत्राकरिता नियमावली तयार केली. हे करताना राज्यातील इतर विभागांचे सहकार्य घेण्यात आले. तसेच संबंधित क्षेत्रातील व्यक्तींची मतेही विचारात घेण्यात आली. त्यानंतर त्यात सुधारणा करून या धोरणांना अंतिम स्वरूप कसे दिले गेले, याविषयी वल्सा नायर सिंग यांनी यावेळी विस्ताराने सांगितले. यातील काही धोरणांच्या अंमलबजावणीत काही अडचणी आहेत. परंतु ...

‘सार्वजनिक- खासगी भागीदारीतून पर्यटनस्थळांचा विकास’

मुंबई:  करोनाची आपत्ती ही संधी समजून पर्यटन विभागाने गेल्या दीड वर्षांत राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. पुढील काळात सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) ३७ पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येणार असून तेथे पंचतारांकित सुविधा निर्माण के ल्या जाणार असल्याचे पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज यांनी शुक्रवारी जाहीर के ले. तर पर्यटनस्थळांवर अनिर्बंध बांधकाम होऊन विद्रूपीकरण होऊ नये यासाठी विकास आराखडा तयार करून नियोजनबद्ध विकास करण्याचे धोरण आखण्यात येत असल्याची माहिती पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर यांनी दिली. लोकसत्ता आयोजित पर्यटन परिषदेत ‘मार्के टिंग मॅग्निफिशिएंट महाराष्ट्र’ चर्चासत्रात ते बोलत होते. वीणा वल्र्डचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर पाटील, कामत हॉटेल्स समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल कामत  आणि पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर  सहभागी झाले होते. आगामी काळात पर्यटनाच्या जागतिक नकाशावर महाराष्ट्र नवी उंची गाठेल असा विश्वास या सर्व मान्यवर तज्ज्ञांनी व्यक्त के ला. करोनामुळे गेले द...

‘मॉडर्न क्लासिक कार रॅली’चे उद्या मुंबईत आयोजन

१० ते ३० वर्षे जुन्या श्रेष्ठ दर्जाच्या मोटारींचा सहभाग मुंबई : श्रेष्ठ दर्जाच्या आधुनिक मोटारींचा सहभाग असलेली देशातील पहिली ‘टर्टल व्ॉक्स मॉडर्न क्लासिक कार रॅली’ रविवारी, ३१ ऑक्टोबर रोजी सोफीटेल, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे आयोजित करण्यात येणार आहे. या ‘कार रॅली’त १९७० आणि २००० या दरम्यान उत्पादित ४० हून अधिक प्रतिष्ठित मोटारी सहभागी होतील. ही कार रॅली ‘कार केअर’ क्षेत्रातील नामवंत ‘टर्टल व्ॉक्स’ कंपनीच्या सहकार्याने ‘ऑटो कार इंडिया’ आणि ‘शामन यंगटायमर्स’ यांनी आयोजित केली आहे. ‘कार रॅली’ वांद्रे-कुर्ला संकुलातील सोफीटेल येथून सुरू होईल आणि कारचा हा ताफा वांद्रे-कुर्ला सी- लिंकवरून मार्गस्थ होऊन पुन्हा ‘बीकेसी’तील सोफीटेल येथे परतेल.  रॅलीत दहा ते ३० वर्षे जुन्या श्रेष्ठ दर्जाच्या मोटारी सहभागी होतील. देशातील हौशी कारप्रेमींमध्ये श्रेष्ठ दर्जाच्या आधुनिक मोटारींबद्दलच्या वाढत्या जाणिवेचे प्रतिबिंब म्हणजे ही ‘मॉडर्न क्लासिक कार रॅली’ आहे. या ‘मॉडर्न क्लासिक कार रॅली’त वृत्तपत्र प्रकाशन व्यावसायिक विवेक गोएंका यांच्या जग्वार ई-टाईप, बीएमडब्ल्यू ई३० (या मोटारी कधीकाळी क...

दिवाळीनिमित्त धारावीतील कुंभारांचे चाक गतिमान

कुंभारवाडा ग्राहकांनी गजबजला; मागणीत वाढ मुंबई : गेली दीड वर्षे करोनामुळे मातीमोल झालेल्या कुंभारांच्या व्यवसायाला यंदा दिवाळीत झळाळी मिळाली आहे. मुंबईकरांची पावले धारावीतील कुंभारवाड्याकडे वळू लागली असून पणत्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली आहे. संक्रांतीला सुगड, दहीहंडीसाठी मडके, नवरात्रोत्सवात गरबी आणि दिवाळीत पणत्या आदींना मोठी मागणी असते. त्यामुळे सण जवळ आले की धारावीचा कुंभारवाडा गजबजून जातो. मात्र गेल्या वर्षी सर्व सण-उत्सव नियम आणि अटींच्या चौकटीत, तसेच करोनाच्या भीतीदायक वातावरणात साजरे झाल्याने याचा परिणाम कुंभारांच्या व्यवसायावरही झाला. धारावीतील दिवे केवळ मुंबईच नाही तर परदेशात पोहोचले आहेत. दिवाळीला एक महिना असतानाच हे दिवे अमेरिका, युरोप, दुबई आणि अन्य देशांत रवाना झाले. तर पंधरा दिवस आधी राज्यातील विविध भागांतील किरकोळ विक्रेते येऊन पणत्या घेऊन गेले. सध्या मुंबईतील किरकोळ विक्रेते आणि ग्राहकवर्ग पणत्या खरेदीसाठी येत आहेत. ‘यंदा दिवाळीत उत्तम प्रतिसाद मिळेल, असा अंदाज बांधून पणत्यांची निर्मिती करण्यात आली आहे. निर्बंध शिथिल झाल्याने व्यावसायिकांचा अंदाज ख...

महापालिकेला १० लिटरचे ४५ ‘प्राणवायू कॉन्सनट्रेटर’

मुंबई : महानगरपालिकेला देण्यात येणारे १० लिटरचे ४५ प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे गुरुवारी भायखळा येथील महापौर निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये विभागाचे संचालक आणि नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. करोनाच्या दोन्ही लाटांमध्ये महानगरपालिकेने तयार केलेल्या नियमावलीचे मुंबईकर नागरिकांनी पालन केले. करोनाचे संकट अजूनही टळलेले नसून नागरिकांनी नेहमी मुखपट्टी वापर करावा, असे आवाहन किशोरी पेडणेकर यावेळी केले. The post महापालिकेला १० लिटरचे ४५ ‘प्राणवायू कॉन्सनट्रेटर’ appeared first on Loksatta . from मुंबई – Loksatta https://ift.tt/2ZGaE80

भूखंडांच्या विकासाचा मार्ग मोकळा

|| प्रसाद रावकर नव्या धोरणानुसार मक्तेदारांना बांधकामाची परवानगी, तर पालिकेला महसूल मिळणार मुंबई :  विकास होण्याची शक्यता नसलेले सुमारे तीन हजार भूखंड पालिकेने केवळ देखभालीसाठी नागरिक, संस्थांना दिले होते. या भूखंडांवर बांधकामास परवानगी नव्हती. मात्र ताबेदारांनी बांधकाम करून बक्कळ पैसे कमविले आणि पालिकेला ठेंगा दाखविला. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने नवे धोरण आखून हे भूखंड मक्त्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुंबईतील तीन हजार लहान भूखंडांच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच पालिकेच्या तिजोरीत विकास शुल्कापोटी महसुलाची भरही पडू शकेल. एकेकाळी मुंबईमधील लहान भूखंड घेण्यास कुणीच नागरिक वा संस्था पुढे येत नव्हत्या. या भूखंडांची देखभाल करणे पालिकेलाही शक्य नव्हते. त्यामुळे असे सुमारे तीन हजार भूखंड पालिकेने नागरिक व संस्थांना नाममात्र भाडे आकारून केवळ देखभालीसाठी दिले होते. या भूखंडांवर कोणतेही बांधकाम करण्याची परवानगी मात्र पालिकेने दिली नव्हती. मुंबईचा पहिला विकास आराखडा १९६४ मध्ये जाहीर झाला. मात्र पहिल्या विकास आराखड्यात या भूखंडांचा योग्य तो विचारच झाला नाही. का...

भूमिगत कचरापेट्यांचा प्रकल्प ‘मातीत’

जागा मिळत नसल्याने योजना गुंडाळणार; सव्वाचार कोटींच्या खर्चावर पाणी मुंबई : कचरापेट्यांमधून ओसंडून वाहणारा कचरा, त्यातून येणारा उग्र वास यातून मुंबईकरांची सुटका व्हावी म्हणून पालिका प्रशासनाने भूमिगत कचरापेट्यांचा तोडगा काढला होता. पण जागा मिळत नसल्यामुळे हा प्रयोग तीन वर्षांनंतरही अयशस्वी ठरला आहे. मुंबईत २० ठिकाणी भूमिगत कचरापेट्या बसवण्याचे पालिकेने ठरवले होते व त्याकरिता जागाही शोधण्यात येत होत्या. सव्वाचार कोटी रुपये खर्चून या पेट्या बसवण्यात येणार होत्या. मात्र त्यापैकी मोजक्या सहा, सात ठिकाणीच या पेट्या बसविण्यात आल्या आहेत. महापालिकेने मोठा गाजावाजा करून मुंबईत चार ठिकाणी भूमिगत कचरापेट्या बसवल्या.  दक्षिण मुंबईत दोन ठिकाणी तर मालाड आणि कांदिवलीत दोन ठिकाणी भूमिगत पेट्या बसवण्यात आल्या होत्या. त्यापैकी  दोन पेट्या गिरगाव चौपाटीजवळ बसवल्या होत्या. या पेट्यांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर घन कचरा विभागाने  प्रत्येक वॉर्डात दोन याप्रमाणे आणखी २० ठिकाणी अशा भूमिगत कचरापेट्या बसवण्याचे ठरवले होते.  अन्य वॉर्डामध्ये भूमिगत पेट्यांसाठी जागा निश्चित करण्याबाबत विभागीय...

२० वर्षांत ४८७ किमी लांबीच्या मेट्रो मार्गांची गरज

‘एमएमआरडीए’च्या ‘सर्वंकष वाहतूक अभ्यास-२’मधील शिफारशी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) सार्वजनिक वाहतूकव्यवस्था बळकट करण्यासाठी पुढील २० वर्षांत (२०४१ पर्यंत) ४८७ किमी लांबीच्या मेट्रोचे, तर २३२ किमी लांबीच्या उपनगरीय रेल्वेचे जाळे विकसित करण्याची गरज असल्याची शिफारस ‘सर्वंकष वाहतूक अभ्यास २’मध्ये करण्यात आली आहे. मेट्रो आणि उपनगरीय रेल्वेसह ५३३ किमी लांबीच्या स्वतंत्र बसमार्गिका, १२६४ किमी लांबीचे रस्तेही विकसित करणे गरजेचे असल्याचे, या आराखड्यात म्हटले आहे. नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएने भविष्यात मुंबई आणि एमएमआरमधील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी २००८ ते २०२१ पर्यंतचा अभ्यास केला आहे. सर्वंकष वाहतूक अभ्यास नावाने हा अभ्यास करत त्यानुसार कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याअंतर्गत ज्या शिफारशी करण्यात आल्या त्यांची अंमलबजावणी करून मेट्रो, सागरीसेतू आणि अन्य प्रकल्प मार्गी लावले आहेत. मात्र यानंतर ही मुंबई-एमएमआरमधील वाहतूकव्यवस्था बळकट झालेली नाही. लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने उपलब्ध खासगी, सार्वजनिक वाहतूकव्यवस्था अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे पुढील २० वर्ष...

३८ वर्षे जुन्या प्रकरणात छोटा राजन निर्दोष

मुंबई : सुमारे ३८ वर्षांपूर्वी दोन पोलिसांना मारहाण करून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपांतून कुख्यात गुंड छोटा राजन याला विशेष न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष ठरवले.राजनवर हत्येचा प्रयत्न करणे, सरकारी कर्मचाऱ्याला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करण्याच्या आरोपाअंतर्गत खटला चालवण्यात आला. मात्र खटल्याशी संबंधित बहुतांश साक्षीदारांचा ठावठिकाणा सापडत नसल्याचा तसेच प्रकरणाची कागदपत्रेही गहाळ झाल्याचे तपास अधिकाऱ्याने न्यायालयाला सांगितले. तसेच प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल न्यायालयात सादर केला. परंतु न्यायालयाने तपास पुढे सुरू ठेवण्याचे आदेश सीबीआयला दिले होते. परंतु साक्षीदार सापडत नसल्याचे सीबीआयकडून न्यायालयाला सांगण्यात आले. त्यामुळे विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी राजनला त्याच्यावरील या सगळ्या आरोपांतून पुराव्याअभावी निर्दोष  ठरवले. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करीत होते. राजनच्या अटकेनंतर तपास सीबीआयकडे वर्ग झाला. हे प्रकरण १९८३ मधील आहे. घाटकोपर येथे पोलिसांनी एक टॅक्सी थांबवली. या टॅक्सीतून राजन त्याच्या साथी...

एसएनडीटी विद्यापीठाच्या १६ अभ्यासक्रमांना मान्यता

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई विद्यापीठ अनुदान आयोगाने () महिला विद्यापीठाच्या () 'दूरस्थ शिक्षण केंद्रात' आणखी सोळा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये बीए, बीकॉम, एमए, आणि एमकॉम या अभ्यासक्रमांचा समावेश असून, बीए आणि एमए पदवीसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र या सात विषयांचा अंतर्भाव आहे. केंद्रामार्फत चालवल्या जाणाऱ्या एकूण १६ अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून शैक्षणिक वर्ष २०२१-२२पासून मान्यता मिळाली आहे. ही मान्यता मिळवण्यात केंद्राच्या संचालिका माजी प्राचार्य डॉ. स्मृती भोसले यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. केवळ सहा महिन्यांच्या आपल्या कारकिर्दीत यूजीसीच्या सर्व नियमांची पूर्तता अधिकृतपणे करण्यात आणि विद्यापीठाने सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यात त्यांनी यश मिळवले आहे. ही विद्यापीठाच्या दृष्टीने एक गौरवास्पद बाब आहे. आयोगाच्या नव्या नियमांनुसार २०२१-२२ चे हे शैक्षणिक वर्ष सुधारित स्वरूपात नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपाची ...

CET Result 2021: एलएलबीसह सहा सीईटींचे निकाल जाहीर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्य प्रवेश परीक्षा कक्षा अंतर्गत उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या आठपैकी सहा परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. गुरुवारी बीपीएड आणि एलएलबी पाचवर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. बीपीएड प्रवेश परीक्षेसाठी राज्यभरातून सहा हजार ८७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी पाच हजार ४८० विद्यार्थी ८ ऑक्टोबरच्या ऑनलाइन परीक्षेला बसले होते. तर मैदानी चाचणी परीक्षा ९ ते १४ ऑक्टोबरला घेण्यात आली होती. या परीक्षेला पाच हजार ४२५ विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी जाहीर झालेल्या निकालात हे सर्व विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर एलएलबी पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीचाही निकालही गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे. या सीईटीला राज्यभरातून २४ हजार ८८२ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी १६ हजार ६६ विद्यार्थी बसले होते. यापैकी १६ हजार ६५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. एमपीएड सीईटीच्या परीक्षेला एक हजार ६४५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी एक हजार ६४० ...

Aryan Khan Bail: मोठ्या भावाला जामीन मिळताच अबरामने मन्नतवरुन मानले चाहत्यांचे आभार, पहा व्हिडीओ

शाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयानं क्रुझ शिप ड्रग्ज प्रकरणी जामीन मंजूर केला. यानंतर मन्नतवर आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. इतरवेळी शाहरूख खान मन्नतच्या बालकनीत येऊन जमलेल्या चाहत्यांना हात हालवत अभिवादन करताना दिसलाय. मात्र, यावेळी आर्यनच्या जामिनाची बातमी ऐकल्यावर आर्यनचा लहान भाऊ अबराम मन्नतवरील बालकनीकडे धावला आणि त्याने बाहेर जमा झालेल्या चाहत्यांना हात हालवत अभिवादन केलं. View this post on Instagram A post shared by Team Shah Rukh Khan (@teamshahrukhkhan) इतर वेळी लाजाळू असणारा आणि माध्यमांपासून, कॅमेरापासून दूर राहणारा अबराम यावेळी मात्र आनंदाने माध्यमांसमोर येताना दिसला. त्यानं बराच वेळ मन्नतच्या बालकनीतून चाहत्यांना हात दाखवत अभिवादन केलं. यानंतर त्याला घरात नेण्यात आलं. #WATCH | Earlier visuals from actor Shah Rukh Khan's residence 'Mannat' in Mumbai after the grant of bail by Bombay High Court to his son Aryan in the drugs-on-cruise case pic.twitter.com/nCtoT7KuEf — ANI (@ANI) Octo...

आर्यन खानला जामीन ; उच्च न्यायालयाचा निर्णय

आज किंवा उद्या तुरूंगाबाहेर मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला क्रूझवरील पार्टीप्रकरणी उच्च न्यायालयाने अखेर गुरुवारी जामीन मंजूर केला. परंतु, जामिनाच्या अटींबाबतचा आदेश शुक्रवारी देण्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याने २५ दिवसांहून अधिक काळ कारागृहात असलेल्या आर्यनची शुक्रवारी किंवा शनिवारी सुटका होऊ शकेल. आर्यनसह त्याचा मित्र आणि प्रकरणातील सहआरोपी अरबाज र्मचट व मुनमुन धमेचा यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला. केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) आर्यनच्या जामिनाला केलेला विरोध खोडून काढणारा युक्तिवाद आर्यनच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहटगी यांनी केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आर्यन आणि अन्य दोन याचिकाकर्त्यांच्या याचिका मंजूर केल्या. जामीन मंजूर का करण्यात आला, याचा तपशीलवार आदेश शुक्रवारी सायंकाळपर्यंत देणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर रोख रकमेवर आर्यनची सुटका करण्याची विनंती रोहटगी यांनी केली. त्यांची ही विनंती न्यायालयाने फेटाळली आणि हमीदारांच्या अटीवर जामीन मंजूर करण्याचे नमूद केले. गेल्या त...

वानखेडेंना अटकेआधी नोटीस ; राज्य सरकारची उच्च न्यायालयात हमी

मुंबई : केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार वा खंडणीच्या आरोपाअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास त्याचा तपास सीबीआय किंवा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्याची मागणी केली आहे. त्यावर वानखेडे यांच्यावर सध्या कोणताही गुन्हा दाखल नाही. परंतु भविष्यात त्यांना अटक करायची झाल्यास ४८ तास आधी नोटीस दिली जाईल, अशी हमी राज्य सरकारने न्यायालयात गुरुवारी दिली. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. आर्यन खानच्या अटकेनंतर खंडणी व भ्रष्टाचाराचे आरोप केले जात असल्याने मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल होण्याची भीती व्यक्त करून अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी वानखेडे यांनी केली. आरोपांच्या चौकशीसाठी चार जणांची समिती नेमण्याच्या मुंबई पोलिसांच्या निर्णयालाही वानखेडे यांनी आव्हान दिले आहे. सुनावणीच्या वेळी सरकारी वकिलांनी वानखेडे यांची याचिका आणि अटक होण्यापासून संरक्षण मिळण्याच्या मागणीला विरोध केला. आरोपांप्रकरणी आताच चौकश...

हा बहुमान सर्वोच्च पुरस्काराइतकाच ! ; ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव’ स्वीकारल्यानंतर डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांची भावना

मुंबई : आपले शिकणे सुरू असते तोवरच आपल्याला शिकवण्याचा अधिकार असतो. मी अजूनही शिकते आहे. ‘लोकसत्ता’ने समाजातील इतर कार्याबरोबरच कलेलाही प्राधान्य दिल्याने हा पुरस्कार मला विशेष वाटतो. ‘लोकसत्ता’ने माझ्यासह समाजातील दुर्गाना दिलेला पुरस्कार एखाद्या सर्वोच्च पुरस्काराइतकाच मानाचा आहे, अशा भावना ज्येष्ठ नृत्यांगना व नृत्यगुरू डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांनी गुरुवारी ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव’ पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केल्या. विविध क्षेत्रांत असामान्य कार्य करणाऱ्या नऊ दुर्गाचा गुरुवारी ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२१’ सोहळ्यात सन्मान करण्यात आला. त्यावेळी डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवाजी पार्क येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ येथे हा सोहळा झाला. कठीण परिस्थितीवर मात करून परित्यक्ता स्त्रियांसाठी कार्य करणाऱ्या अरुणा सबाने, प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन बनवणाऱ्या डॉ. मेधा ताडपत्रीकर, रेशमाच्या किडय़ांपासून मिळणाऱ्या स्त्रवावर संशोधन करून त्याचा मानवावर उपचारांसाठी उपयोग करणाऱ्या डॉ. अनुया निसळ, रत्नांची पारख करणाऱ्या डॉ. जयश्री पंजीकर, ज्य...

शेअर दलालांकडून ‘डब्बा ट्रेडिंग’द्वारे अपहार ; सरकारी यंत्रणांना अंधारात ठेवून बेकायदा ७ हजार कोटींचे रोखीचे व्यवहार

मुंबई : समाजमाध्यमांवरील उपयोजनांचा (अ‍ॅप्लिकेशन्स) वापर करून शेअर मार्केटमधील निर्देशांकाच्या चढउतारावर डब्बा ट्रेिडगचा बेकायदा उद्योग करणारी साखळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणली असून याप्रकरणी चार शेअर दलालांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडे सापडलेल्या नोंदींवरून त्यांनी गेल्या सात महिन्यांत सुमारे सात हजार कोटी रुपयांची उलाढाल केल्याचे निष्पन्न झाले आहे. हा सर्व व्यवहार अंगडियांच्या माध्यमातून रोखीने झाल्याने त्यात काळा पैसा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घाटकोपर पार्कसाईट परिसरात हजारो कोटींची डब्बा ट्रेिडग सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ७च्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार मुंबई शेअर बाजार ‘बीएसई’चे साहाय्यक महाव्यवस्थापक किरण सावंत व राष्ट्रीय शेअर बाजार ‘एनएसई’चे मुख्य व्यवस्थापक प्रकाश तन्ना यांना सोबत घेऊन पोलिसांनी इमारतीतील दोन खोल्यांवर छापा टाकला. तेथे ११ व्यक्ती समभागांची खरेदी-विक्रीचे व्यवहार करत असल्याचे आढळून आले. बीएसई व एनएसई या स्टॉक एक्स्चेंजवरील समभाग व निर्देशांकाच्या चढ उतारांवर सट्टा लावण्यात येत होता. मोठे व्यवहार ‘एनएसई’ व मुंब...

मुंबै बँकेची चौकशी सुरूच राहील! ; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती (मुंबै) सहकारी बँकेतील गेल्या पाच वर्षांतील अनियमिततेची चौकशी करण्याच्या सहकार विभागाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. त्यामुळे आदेश निघूनही चौकशीस सुरुवात न करणाऱ्या  सहकार खात्यातील अधिकाऱ्यांचा चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे.   बँकेच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेत सहकार विभागाने जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. सहकार कायद्याच्या कलम ८३ नुसार ही चौकशी होणार होती. तीन महिन्यांत चौकशी अहवाल देण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी दिले होते. या आदेशाला बँकेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. ही याचिका न्या. गिरीश कुलकर्णी यांनी फेटाळली. बँकेतर्फे विनित नाईक आणि सरकारतर्फे एस यू कामदार या ज्येष्ठ वकिलांनी बाजू मांडली. मुंबै बँकेच्या कारभाराबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन सहकार विभागाने बँकेचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार चाचणी लेखापरीक्षण आणि बँकेतील प्रशासकीय अनियमिततेबाबतच्या अहवालात बँकेच्या कारभाराबाबत गंभीर ठपका...

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे ; २८ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच २८ टक्के महागाई भत्त्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण गुरुवारी रात्री मागे घेतले. महागाई भत्त्याबरोबरच काही मागण्या मान्य झाल्याने एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने हा निर्णय घेतला. मात्र, उपोषणाचे रूपांतर अघोषित संपात झाल्याने गुरुवारी एसटी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील २५० पैकी १९० आगार पूर्णत: बंद झाले होते. त्यामुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडले. एसटी महामंडळ आणि एसटी कर्मचारी संयुक्त कृती समिती यांच्यात गुरुवारी बैठक झाली. त्यात एसटी कर्मचाऱ्यांना २८ टक्के  महागाई भत्ता, घरभाडे भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे कामगार संघटनांच्या कृती समितीने जाहीर केले. एसटी महामंडळाने कामगारांच्या महागाई भत्त्यात नुकतीच पाच टक्के  वाढ के ली होती. त्यामुळे महागाई भत्ता १२ टक्क्यांवरून १७ टक्के  झाला. परंतु, ही वाढ फक्त ५०० ते ६०० रुपयांचीच होती. त्यातच कर्मचाऱ्यांसाठी अडीच हजार रुपये दिवाळी भेटची घोषणा करण्यात ...

३८ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात छोटा राजन निर्दोष

मुंबई : अडतीस वर्षांपूर्वी दोन पोलिसांना मारहाण करून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपांतून कुख्यात गुंड छोटा राजन याची विशेष न्यायालयाने गुंड छोटा राजन याची पुराव्यांअभावी निर्दोष ठरवले. हत्येचा प्रयत्न करणे, सरकार कर्मचाऱ्याला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करण्याच्या आरोपाअंतर्गत राजनवर खटला चालवण्यात आला.  मात्र खटल्याशी संबंधित बहुतांश साक्षीदारांचा ठावठिकाणा सापडत नसल्याचा तसेच प्रकरणाची कागदपत्रेही गहाळ झाल्याचे तपास अधिकाऱ्याने न्यायालयाला सांगितले. तसेच प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल न्यायालयात सादर केला. परंतु न्यायालयाने तपास पुढे सुरू ठेवण्याचे आदेश सीबीआयला दिले होते. परंतु साक्षीदार सापडत नसल्याचे सीबीआयकडून न्यायालयाला सांगण्यात आले. या पाश्र्वभूमीवर विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी राजनला त्याच्यावरील या सगळ्या आरोपांतून पुराव्याअभावी निर्दोष  ठरवले.  या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून होता. राजनच्या अटकेनंतर तपास सीबीआयकडे वर्ग झाला. १९८३ मधील हे प्रकरण आहे. घाटकोपर येथे पोलिसांनी एका टॅक्सीला थांबवले. य...

आज ‘लोकसत्ता’ची पर्यटन परिषद ; राज्यातील पर्यटनवृद्धीच्या नव्या संधींवर चर्चा

मुंबई : दिवाळी सुटीच्या हंगामाच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्राला जगाच्या आणि देशाच्या पर्यटन नकाशावर पुढे आणण्यासाठी कोणती धोरणे आखण्यात येत आहेत, पर्यटन उद्योगाच्या प्रगतीच्या नव्या संधी याचा ऊहापोह ‘लोकसत्ता’च्या वतीने आज, शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पर्यटन परिषदेत होणार आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत चटवाल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर आदी मान्यवर या पर्यटन परिषदेत सहभागी होणार आहेत. विदर्भातील जंगलांपासून ते कोकणातील समुद्र किनाऱ्यापर्यंत आणि लेणी, धार्मिक क्षेत्रे अशा विविध पर्यटन क्षेत्रांची देणगी महाराष्ट्राला लाभली आहे. करोनामुळे गेली पावणे दोन वर्षे पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगावर विपरीत परिणाम झाला. आता करोनाचे सावट दूर होत असल्याने दिवाळीच्या सुटीच्या हंगामात पर्यटनाला पुन्हा चालना मिळण्याची अपेक्षा असून पर्यटन उद्योग पुन्हा भरारी घेण्यास सज्ज होत आहे. अशा वातावरणा...

ऐनवेळी मेल-एक्स्प्रेस रद्द केल्यामुळे प्रवाशांचे हाल

मुंबई, पुण्याहून अमरावती, नागपूरकडे जाणाऱ्या गाडय़ा ३० ऑक्टोबपर्यंत स्थगित मुंबई : मध्य रेल्वेने बडनेरा येथे तांत्रिक कामांसाठी गुरुवारपासून दोन दिवसांचा ब्लॉक घेतला असून त्यामुळे मुंबई, पुणे येथून नागपूर, अमरावतीकडे जाणाऱ्या काही गाडय़ा ३० ऑक्टोबपर्यंत रद्द  करण्यात आल्या आहेत. अचानक गाडय़ा रद्द झाल्याने तीन महिने आधी आरक्षण  केलेले  प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत. गाडी क्रमांक ०२१११ सीएसएमटी ते अमरावती एक्स्प्रेस, तर ०२११२ अमरावती ते सीएसएमटी गाडी गुरुवारी  आणि शुक्र वारीही रद्द के ली. तर पुणे-अमरावती-पुणे, सीएसएमटी ते नागपूर ते सीएसएमटी दुरान्तो एक्स्प्रेस, पुणे ते नागपूर ते पुणे या मार्गावरील गाडय़ाही २९ आणि ३० ऑक्टोबरला रद्द करण्यात आल्या आहेत. अमरावती-सुरत धावणारी गाडी क्र मांक ०९१२५ आणि ०९१२६ भुसावळपासून सुटणार आहे. अहमदाबाद-नागपूर-अहमदाबाद गाडी भुसावळ, इटारसी, नागपूरमार्गे चालवण्यात आल्या. प्रवाशांना २७ ऑक्टोबरला याची माहिती देण्यात आली. गाडय़ा अचानक रद्द झाल्याचा संदेश प्रवाशांच्या भ्रमणध्वनीवर आल्यानंतर त्यांची तारांबळ उडाली.   मुंबईत सरकारी क...